माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • पायाभुत चाचणी

     स्वरुप व तयारी

        मित्रांनो आपणापैकी अनेकांनी आणखी आकारीक मुल्यमापन चाचणी घेतलीच नाही कारण आपला एक ग्रह झाला आहे, की पायाभूत चाचणी व आकारीक चाचणी या एकच आहेत. परंतु आपला हा गैरसमज पुर्णपणे चुकीचा असून आपण आपल्या स्तरावर आकारीक चाचणी घ्यावी तर पायाभुत चाचणीचे पेपर प्रशासन आपणास उपलब्ध करुन देणार आहे.

              मित्रांनो आतापर्यंत झालेल्या इतर चाचण्या व पायाभूत चाचण्या यात फरक काय असे वाटणे साहजिकच आहे, मात्र हे लक्षात घ्या या चाचणीचे मार्क आपणास तात्काळ अॉनलाइन फिड करायचे आहेत तसेच या चाचणीचे त्रयस्त यंत्रणेकडून मुल्यमापन होणार आहे. परंतु काळजी करु नका यात शिक्षकावर कोणत्याही प्रकारची प्रत्यक्ष कारवाई नाही. फक्त आपण आता आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारायची आहे. वर्षाखेरीज प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये किमान 10% अपेक्षित आहे.
                 आपण सप्टेबर दुसरा आठवड्यात राज्यभर पायाभूत चाचणी घेणार आहोत. मुलांना काय येते, कोठे मदतीची गरज आहे ते शोधण्यासाठी या चाचण्या आहेत. शिक्षकांनी आपापल्या वर्गात त्या घ्यायच्या आहेत.  या चाचणीचा बाऊ होणार नाही, वातावरण आश्वासक असेल, प्रात्यक्षिक-लेखी प्रश्न सोडवताना मुलांना मजा येईल, आणि एखादी न येणारी गोष्ट चाचणी देता-देता मूल सहज शिकेल अशी अपेक्षा आहे.
                 मुलांची गणिताची समज, कौशल्ये, विचारक्षमता तपासण्यासाठी काही वेगळ्या प्रकारचे प्रश्न यात आहेत. मुलांना कदाचित या प्रकारच्या प्रश्नांचे अनुभव याआधी मिळाले नसतील. त्यामुळे त्या प्रकारच्या प्रश्नांचा चाचणीपूर्वी जरूर सराव करून घ्यावा. म्हणजे मुलांना त्या गोष्टी चाचणीत करता येतील. या चाचण्या अजिबात गोपनीय नाहीत. चाचणीतील विशिष्ट प्रश्नांची उत्तरे पाठ करून घेऊ नयेत, इतकेच.
                   संख्यांची समज तपासताना केवळ संख्येचे वाचन लेखन तपासून पुरत नाही. ती संख्या म्हणजे नेमके किती, ते शतक-दशक-एकक प्रतीके वापरून दाखवता आले पाहिजे. तुमच्या शाळेत नेहमी जी प्रतीके वापरली जात असतील, उदा. काड्यांचे गठ्ठे-सुटे, मणी-माळा, दहाच्या व एकच्या नोटा, दांडे-सुटे, ती जास्त संख्येने जमवून ठेवा. जी प्रतीके तुम्हाला सोयीची वाटतील ती वापरा. एक, दहा, शंभर, हजारच्या खोट्या नोटा जमवा अथवा कार्डांवर लिहून मुलांच्या मदतीने तयार करा. प्रतीके वापरून संख्या तयार करणे, जमिनीवर अथवा पाट्यांवर आखलेल्या घरांमध्ये ती मांडणे व त्यानुसार संख्या अंकात लिहिणे याचा पुन्हा सराव घ्या.
                    चाचणीत पुढील प्रकारचे प्रात्यक्षिक, मनात विचार करून उत्तर लिहिण्याचे किंवा लेखी प्रश्न असतील.
    - ऐकलेली संख्या प्रतीके वापरून दाखवणे, अंकातील संख्या वाचून प्रतीके देणे, प्रतीके पाहून संख्येचे नाव सांगणे.
    - आयतातील चौकटी मोजून गुणाकार लिहिणे.
    - मोजपट्टीच्या सहाय्याने लांबी मोजणे, टेलरिंग टेपच्या सहाय्याने लांबी, परिमिती मोजणे.
    - कोनमापकाच्या सहाय्याने कोन मोजणे व दिलेल्या मापाचा कोन काढणे.
    - कंपासच्या सहाय्याने वर्तुळ काढणे.
    - रंगवलेला भाग अंश छेद रूपात व दशांशात लिहिणे, सांगितलेला अपूर्णांक रंगवणे.

    यासारख्या गोष्टींचा चाचणीपूर्वी सराव घ्या.

    लेखी चाचणीतील प्रश्नही थोडे निराळ्या प्रकारचे असू शकतील. इयत्ता दुसरी व तिसरीच्या मुलांसाठी एक एक प्रश्न वाचत तो प्रश्न समजावून सांगा व मग सोडवायला सांगा. उत्तराचा क्ल्यू न देता प्रश्न समजावा. अगदी आठवीपर्यंतच्या मुलांना गरज असेल तेथे प्रश्न वाचून दाखवा. उत्तरामध्ये मांडणी, रीत, शुद्धलेखन यातले काहीही तपासायचे नाही. फक्त गणिताची समज तपासायची आहे. त्यामुळे उत्तर आले किंवा नाही आले इतकेच पहायचे आहे.

    #चाचणीचा श्रेणीनिहाय निकाल बनवायचा आहे. प्राप्त गुणांसह त्या-त्या विद्यार्थ्यांना कोणती श्रेणी द्यावी हे खाली दिले आहे.

    ��पायाभूत  चाचणी  श्रेणी ��
    ८१% ते १००% --- अ
    ६१% ते ८० %---- ब
    ४१% ते ६० %----क
    ० %ते ४० %-----ड

    पायाभूत चाचणी चा निकाल श्रेणीनुसार......        

    # इ.२ री .... ३० गुण

    २५ ते ३० ----- अ              
    १९ ते २४----- ब
    १३ ते १८----- क
    ० ते  १२----- ड

    #इ.३री व इ. ४ थी ......४० गुण

    ३३ ते ४० ---अ
    २५ ते ३२---- ब
    १७ ते २४----क
    ० ते १६ ----- ड

    #इ.५ वी व इ.६ वी ..... ५० गुण

    ४१ ते ५०------ अ
    ३१ ते ४०------ ब
    २१ ते ३० ------- क
    ० ते २० -------ड

    #इ.७ वी व  इ. ८ वी .......६० गुण

    ४९ ते  ६० ------अ
    ३७ ते ४८ ------ब
    २५ ते  ३६ -----क
    ० ते  २४ ------ड