6 वी गणित विषयाचा सुट्टीतील गृहकार्य
टिप- हे गृहकार्य सर्वसामान्य मुलांना समोर ठेऊन तयार केला आहे. यात आपण मुलांच्या आवडीप्रमाणे व स्थानिक परिस्थितीप्रमाणे बदल करता येतील.
1. चढता व उतरता क्रम (पाच अंकी) यांच्या 5 आकृत्या बनविणे.
उदा - खपटाच्या तीन - चार पायऱ्या बनविणे. व त्यावर चढत्या / उतरत्या क्रमाने संख्या दर्शवणे.
2. कोणतेही पाच गणिती कोडी देणे, ते सोडवून आणने व त्यासारखीच आणखी किमान 5 कोडी तयार करणे.
3. कोलाजकामाद्वारे अंकाचे आकार तयार करा. लहान मणी, निरुपयोगी धान्य कागदावर फेविकॉलद्वारे चिटकवून अंकाचे आकार तयार करा. (कोणत्याही पाच अंकी दहा संख्या सांगणे.)
4. छापील चित्रातील अंक कार्ड (0 ते 9 ) तयार करणे.त्यांचा संग्रह बनविणे.(कमीत कमी 4-5 संच) व त्यापासून सांगितलेली संख्या बनविणे. व बनविलेली संख्या ओळखणे. त्यातील कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत सांगता येणे.
उदा- दिनदर्शिकेतील अंक
5. विविध वस्तूंना एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लाख असे संकेतांक देणे. व त्यांचा संग्रह करुन सांगेल ती संख्याइतक्या वस्तू देणे. किंवा वस्तूवरुन संख्या सांगणे.
उदा - 4 कांड्या (हजार), 6 पेन्सिल (शतक), 5 चिंचोके (दशक), 8 खडे (एकक) = 4,658
6. कोणत्याही पाच वस्तूंची लांबी, रुंदी व जाडी मोजून त्यांची क्षेत्रफळे / परिमीती काढणे.
7. लहान मुलांचे पैसे / नकली नोटांचा संग्रह करणे व मागितली रक्कम देणे.
8. दिलेल्या अपूर्णांकाचा आकार तयार करणे.
उदा - 1/2, 3/4, 1/4, 1/5, 1/3, 2/3, इ.
यासाठी खपटाचे विविध आकार तयार करुन सांगितलेल्या अपूर्णांकाइतक्या भागास रंग देणे.
9. दैनंदिन व्यवहारातील बेरीज व वजाबाकी, गुणाकार व भागाकार यांची प्रत्येकी 10-10 व्यवहार लिहून काढणे. (स्वरुप शाब्दिक उदाहरणांप्रमाणे)