माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • रचनावादी फिनलंडची शाळा

    ==💻==Ⓜ🅰🅿==💻==

    🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
    चला जाऊया ज्ञानरचनावादी फिनलंडच्या शाळेत
    🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

    🔆🔆🔆🔆🔆🔆🔆
    🔆 अंक- ४ भाग - १ 🔆
    🔆🔆🔆🔆🔆🔆🔆

    🎋भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजींनी ज्या कौशल्याधिष्ठीत शिक्षण पध्दतीचे [skill based education] कौतुक केले व भारतीय शिक्षण पध्दतीत त्यादृष्टीने बदलाचे संकेत दिले. म.गांधीजींना अभिप्रेत मुलोद्योगी शिक्षण पध्दती व गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांनी साकारलेले शांतीनिकेतन तर स्वामी विवेकानंदाना अपेक्षित बालकांच्या सुप्त गुणांचा विकास करणारी ही शिक्षण पध्दती 1970 पासून आपल्या देशात राबवून ती यशस्वी करुन दाखविणारा देश म्हणजे "फिनलंड".
    51 दिवसांची रात्र अनुभवणाऱ्या युरोपातील या देशाने शिक्षण क्षेत्रात पहाट निर्माण केली. अमेरिकेसह जगातील सर्व राष्ट्रांना हेवा वाटणाऱ्या या देशातील शिक्षण पध्दतीचे प्रमुख वैशिष्टये पाहूयात.

    📃 शिक्षण हक्क कायदा[RTE] -

    राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात अवलंबलेली मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात या देशाने 1970 पासूनच करुन शिक्षण क्षेत्रात भारताला खुप मागे टाकले. भारताला मात्र हा कायदा पास करण्यासाठी 2009 चे वर्ष उजडावे लागले. आपल्या देशात गल्लोगल्ली असणारी LKG-UKG ची दुकाने तिथे कोठेच नाहीत. तिथली मुले 7 वर्षे पुर्ण झाल्यानंतरच शाळेची पहिली पायरी चढतात.व पुढील 9 वर्षे सरकारी शाळांमध्ये सक्तीचे प्राथमिक शिक्षण घेतात.तेही कोणतेही खाजगी शिकवणी न घेता.

    📚अभ्यासक्रम -

     ज्ञानरचनावादावर आधारीत अभ्यासक्रमाचा स्विकार या देशाने 1970 पासूनच करुन पुर्ण अभ्यासक्रम हा कौशल्याधिष्ठीत बनविला. पाठांतरास विरोध व सृजनशीलतेस वाव देणाऱ्या या अभ्यासक्रमानेच फिनलंडला बौध्दिक संपदेचे भांडार बनविले. म्हणूनच की काय जगात तंत्रज्ञानाचा प्रसार करणारी Nokia कंपनी असो किंवा आपल्या हातात असणाऱ्या अँन्ड्रॉईड बेस्ड
    मोबाईलमधील लाइनेक्स (lunix) तंत्रज्ञान पासून ते जगभर सर्वात जास्त लोकप्रिय असलेला 'अँग्रीबर्ड' गेम बनवणारी रोवियो कंपनी असो, प्रत्येक क्षेत्रात आज फिनलंडचा बोलबाला आहे. फक्त वाचन-लेखन व मुलभूत गणिती क्रियांवर भर न देता कृतीयुक्त अभ्यासक्रमाद्वारे मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणाऱ्या उपक्रमांवर भर दिला देणाऱ्या या देशात अभ्यासक्रमात इतका लवचिक आहे की वर्गशिक्षक मुलाच्या क्षमता व आवड लक्षात घेऊन प्रत्येकासाठी वेगवेगळे आवश्यक ते अध्ययन अनुभवाचे नियोजन करतात. तसेच तो अभ्यासक्रम पुर्ण करण्यासाठी प्रत्येक बालकाला स्वतःचा वेळ दिला जातो. तो वेळेत पुर्ण करण्याचे दडपण शिक्षकावर किंवा विद्यार्थ्यांवर कधीच नसते.

    🐬 शिक्षक - विद्यार्थी प्रमाण-

    भारतात 35 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक असणारे प्रमाण फिनलंडमध्ये 14 वर आहे. याचे कारण आहे, 'प्रत्येक मुल हे विशेष असते व त्याला विशेष असे अध्ययन अनुभव लागतात' असे मानणारी शिक्षण पध्दती. त्यामुळे प्रत्येक मुलाच्या विशेषत्वाला विशेष पध्दतीने हाताळण्यासाठी हे प्रमाण इतके कमी आहे. यामुळेच की काय तिथे मुलांना कोणताही लेखी गृहपाठ घरुन करुन आणणेसाठी दिला जात नाही किंवा खाजगी शिकवणी लावली जात नाही. जे अनुभव द्यायचे ते केवळ शाळेतच.

    🍄आदर्श सरकारी शाळा -

    तेथिल 99% विद्यार्थी सरकारी शाळेत शिकतात यावरुनच या सरकारी शाळांच्या दर्जाबाबत माहिती मिळते. तुम्ही कितीही दुर्गम भागातील शाळेत जा, तिथेही त्याच सुविधा मिळतील ज्या सुविधा या देशाची राजधानी 'हेलसिंकी' मधील प्रसिध्द शाळेत मिळतात. सर्व सरकारी शाळांचे वैशिष्ट्ये म्हणजे तेथील प्रत्येक शाळेत अभ्यासक्रम व सर्व सुविधा समान आहेत. प्रत्येक शाळेत सर्व प्रकारच्या संगीत वाद्यापासून ते प्रोजेक्टरपर्यंत सर्व साहित्य व सुविधा मिळतील. मुलांमधील सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी हरत-हेच्या सुविधा प्रत्येक शाळेत असल्याने दर्जेदार शिक्षणासाठी पालकांचे शहराकडे स्थलांतर होतच नाही. कितीही श्रीमंत पालक असो, त्याच्या पाल्यासोबतच झोपडपट्टीतील मुले शाळा शिकतात. सगळीकडे शिक्षक व सुविधा या सारख्याच असल्याने येथे नामांकीत शाळेत प्रवेशासाठी घोडेबाजार सुरु आहे, असे शिक्षणाचे बाजारीकरण करणारे दृश्य शोधूनही सापडणार नाही.

     क्रमशः 🔜🔜🔜🔜🔜

    🏂संदर्भ - गुगल व विकीपिडीया शोध

    📝 शब्दांकन - सोमवंशी तानाजी 9011104464

    🎏 साभार - "माय मराठी शाळा" फेसबुक पेज
    https://m.facebook.com/Mymarathischool/
    posted on 19 October 2015 at 20:41