माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • सेवापुस्तीका नोंदी
    सेवापुस्तक अद्ययावत करतांना खालील बाबींच्या नोंदी केलेल्या आहेत किंवा नाही हे तपासून पहावे व नसतील तर तशा नोंदी घेऊन सेवापुस्तक अद्ययावत करावे.

    --------------------------
    ��१. पहिल्या पानावरील जन्मतारखेची नोंद पडताळणी
    ��२. पहिल्या पानावरील नोंद दर पाच वर्षांनी तपासणी करुन प्रमाणित करणे.
    ��३. वैद्यकिय दाखल्याची  नोंद.
    ��४. जात पडताळणी बाबदची नोंद.
    ��५. भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक नोंद.
    ��६. निवृत्तीवेतन नामनिर्देशनाची नोंद.
    ��७. मृत्यू अन सेवानिवृत्ती उपदान नामनिर्देशनाची नोंद.
    ��८. गटविमा योजणेच्या सदस्यत्वाची नोंद.
    ��९. गटविमा योजणेच्या वर्गणीची नोंद. ( सुरुवातीची व वेळोवेळी बदलानुसार )
    ��१०. गटविमा नामनिर्देशनाची नोंद.
    ��११. विहीत संगणक आर्हता परिक्षा उत्तीर्ण नोंद.
    ��१२. सेवांतर्गत प्रशिक्षणाची नोंद.
    ��१३. वार्षिक वेतनवाढ नोंद.
    ��१४. वार्षिक वेतनवाढ मंजुरीनंतर रकाना क्र. ८ मध्ये कर्मचाऱ्याची स्वाक्षरी.
    ��१५. नाव बदनाची नोंद.
    ��१६. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती आदेशाची नोंद.
    ��१७. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती नुसार कार्यमुक्त / हजर / पदग्रहण अवधी नोंद.
    ��१८. सेवेत कायम केल्याची नोंद.
    ��१९. स्वग्राम घोषपत्राची नोंद.
    ��२०. वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती नोंद व पडताळणीची नोंद.
    ��२१. पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना / एकस्तर यामुळे झालेल्या वेतन निश्चितीची नोंद.
    ��२२. पुरस्कार प तद्नुषंगिक अनुज्ञेय लाभाच्या नोंदी.
    ��२३. अर्जीत / परावर्तीत रजा दर सहामाही जमा केल्याची नोंद.
    ��२४. घेतलेल्या रजेच्या आदेशाची नोंद व रजा लेख्यात खर्ची घातल्याची नोंद.
    ��२५. रजा प्रवास सवलत नोंद.
    ��२६. दुय्यम सेवापुस्तक दिल्याबाबतची नोंद.
    ��२७. मानीव दिनांक / वेतन समानीकरण संबंधीच्या नोंदी.
    ��२८. सेवा पडताळणीची नोंद.
    ��२९. जनगणना रजा नोंद.
    ��३०. सुट्टीच्या कालावधीत प्रशिक्षण झालेल्या रजा नोंदी.
    ��३१)हिंदी व मराठी भाषा पास झाल्याची वा सुट मिळाल्याची नोंद .