माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • मकरसंक्रांत

      >>
    2100 पासून मकरसंक्रांत 16 जानेवारीला
    मनीषा फाळके - सकाळ वृत्तसेवा
    3246 मध्ये 1 फेब्रुवारीला संक्रांत 

    मुंबई- मकरसंक्रांत म्हटले की डोळ्यासमोर 14 जानेवारी ही तारीख येते; पण 14 जानेवारी म्हणजेच संक्रांत हे समीकरण चुकीचे आहे. कारण सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी मकरसंक्रांत चक्क 22 डिसेंबरला येत होती आणि 1899 पर्यंत या सूर्यसंक्रमणाने 13 जानेवारीपर्यंतचा प्रवास केला.

    वर्षभर विविध राशीतून सूर्य संक्रमण करत असतो. मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्याचा प्रवास धनु राशीतून मकर राशीत होतो. पृथ्वीचा अक्ष कललेला असल्याने दर 6 महिन्यांनी सूर्याचे उत्तरायन आणि दक्षिणायन होत असते. उत्तरायणाच्या कालावधीत दिवस मोठा होत जातो. संक्रांतीच्या दिवशी होणाऱ्या उत्तरायनामुळेच या संक्रांतीला अन्य संक्रांतींच्या तुलनेत विशेष महत्त्व आहे.

    याबाबत सविस्तर माहिती देताना खगोलतज्ज्ञ अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले की, सूर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून तो पुन्हा मकर राशीत प्रवेश करेपर्यंत 365 दिवस 6 तास 9 मिनिटे आणि 10 सेकंद एवढा कालावधी लागतो. ग्रेगरियन कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे शतकपूर्तीच्या अंकास 400 ने भाग जात नसेल, तर त्यावर्षी लीप इयर धरले जात नाही. त्यामुळे दर 400 वर्षांनी मकरसंक्रांतीचा दिवस 3 दिवसांनी पुढे जातो; तसेच दरवर्षीचा 9 मिनिटे 10 सेकंद हा काळ साठत साठत जाऊन दर 157 वर्षांनी मकरसंक्रांतीचा दिवस आणखी एक दिवसाने पुढे जातो. त्यामुळे मकरसंक्रांतीचा दिवस पुढे पुढे जात असतो.

    इ. स. 2000 मध्ये मकरसंक्रांत 22 डिसेंबरला येत होती. 1899 मध्ये मकरसंक्रांती 13 जानेवारीला आली होती. 1972 पर्यंत मकरसंक्रांती 14 जानेवारीलाच येत होती. 1972 पासून 2085 पर्यंत मकरसंक्रांती कधी 14, तर कधी 15 जानेवारीला येईल. इ. स. 2100 पासून मक्ररसंक्रांती 16 जानेवारीला येईल. अशा रीतीने पुढे सरकत सरकत 3246 मध्ये मकरसंक्रांत 1 फेब्रुवारीला येणार आहे.

    अफवांवर विश्‍वास ठेवू नका! संक्रांतीच्यानिमित्ताने अफवांचा सुळसुळाट असतो. एक अपत्य आणि तोही मुलगा असेल तर हे करा, दोन अपत्ये असतील तर ते करा, अशा अफवा या दिवसांमध्ये पसरतात. मुळात संक्रांतीच्या दिवसापासून दिनमान मोठे होत असते. दिनमान मोठे होणे ही वाईट गोष्ट नाही. म्हणूनच संक्रांतही वाईट नसते. म्हणून या दिवसानिमित्त पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन दा. कृ. सोमण यांनी केले आहे.