२५१) निरोगी शरीरात निरोगी मन वास करते.
२५२) जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.
२५३) पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत.
२५४) आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये; परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.
२५५) अंहकार हा तपःसाधनेचा महान शत्रू आहे.
२५६) मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून आपला अधःपात करून घ्यावा लागतो.
२५७) नैतिक पाया ढासळला की धार्मीकता संपलीच म्हणून समजा.
२५८) अंतर्बाह्य प्रांजळपणा हाच प्रीतीचा प्राण होय.
२५९) सामर्थ्याच्या पाठीमागे शील हवे.
२६०) शहाणपणाचे प्रदर्शन करणारा पोपट कायमचा बंदिवान होतो.
२६१) गवताची दोरी वळली म्हणजे तिने मत्त हत्तीसुध्दा बांधला जातो.
२६२) दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे.
२६३) पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो.
२६४) पुढे मिळणाऱ्या आनंदाच्या कल्पनेने जे सुख मिळते; त्या सुखाचे नाव उत्साह !
२६५) स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करणाऱ्यांच्या रक्ताशिवाय उभे राहत नाही.
२६६) अन्याय आणि अत्याचार ह्याला सक्त विरोध हाच सत्याचा स्वभाव.
२६७) चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुध्दीचा विकास एकांतात होतो.
२६८) स्वधर्माविषयी प्रेम, परधर्माविषयी आदर आणि अधर्माविषयी उपेक्षा याचाच अर्थ धर्म.
२६९) अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !
२७०) क्रोध माणसाला पशू बनवतो.
२७१) आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात; फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.
२७२) आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको.
२७३) जे नंतर चांगले वाटते, तेच कृत्य नैतिक व जे नंतर दुःखकारक ठरते, ते अनैतिक !
२७४) कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागतो.
२७५) परमेश्वर ख्रऱ्या भावनेलाच साहाय्य करतो.
२७६) भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात; त्याची खपली काढू नये.
२७७) माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हाच खरा धर्म.
२७८) बोलावे की बोलू नये, असा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.
२७९) शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.
२८०) तिरस्कार पापाचा करा; पापी माणसाचा नको.
२८१) आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही; सुविचार असावे लागतात.
२८२) जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.
२८३) आपलं जे असतं ते आपलं असतं आणि आपलं जे नसतं ते आपलं नसतं.
२८४) जो धोका पत्करण्यास कचरतो, तो लढाई काय जिंकणार !
२८५) लीनता आणि विनयशिलता या धार्मिकतेच्या दोन शाखा आहेत.
२८६) ह्रदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत.
२८७) कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात तर ते दुर पळतात.
२८८) हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपाला की दुःख संपते.
२८९) आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
२९०) गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
२९१) आदर्श गृहिणी ही शेकडो गुरूंहून श्रेष्ठ आहे.
२९२) जो त्याग मनापासून केलेला नसतो, तो टिकत नसतो.
२९३) अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.
२९४) तुम्हाला जर मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना .
२९५) न मागता देतो तोच खरा दानी.
२९६) चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.
२९७) केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.
२९८) समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही
२९९) भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.
३००) दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.