ई - लर्निंग म्हणजे काय ?
# इतर विविध साधनांच्या सहाय्याने शाळा कशी ई - लर्निंग करावी, यासाठी इथे क्लिक करा.
- इलेक्ट्रॉनिक साधनांच्या सहाय्याने इंटरनेटच्या माध्यमातून दिलेली लर्निंग म्हणजे ई - लर्निंग. ई लर्निंगमध्ये सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक साधनातून विविध माध्यमाद्वारे प्रदान करण्यात येऊ शकते.
उदा - संगणक, मोबाईल, लँपटॉप, रेडिओ, टीव्ही, प्रोजेक्टर, इंटरँक्टीव्ह बोर्ड इ. इलेक्ट्रॉन साधनाच्या सहाय्याने अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक मनोरंजक व आकलन, उपयोजनपूर्ण बनविण्यासाठी विविध संकल्पनांचे मॉडेल, अॅनिमेशन, प्रेझेंटेशन, विडीओ, इंटरनेट, विविध अॉनलाइन असाइन्मेन्ट्स या माध्यमांचा उपयोग करणे म्हणजे ई-लर्निंग होय."
आपल्यापैकी अनेकांचा असा गैरसमज असतो की प्रोजेक्टर किंवा LED TV चा वापर करुनच ई - लर्नींग शाळा बनविता येते. अध्यापनात रेडीओचा उपयोग करणे हा सुध्दा ई - लर्निंगचाच भाग आहे.
ई - लर्निंगमध्ये विद्यार्थ्यांच्या कृतीयुक्त अध्ययनावर भर दिला जातो, त्यामुळे यासाठी इंटरनेट जोडणी व इंटरँक्टीव्ह बोर्डचा उपयोग अधिक प्रभावी ठरतो आहे. आपण त्याची सविस्तर माहिती पाहणारच आहोत.
कमी किंमतीत शाळा "ई - लर्निंग" कशी करावी ?
- लहान शाळेत लँपटॉप, संगणकाच्या सहाय्याने अध्ययन - अध्यापन केल्यास ते ई - लर्निंगच ठरते. मात्र 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना संगणकावरील लहान स्क्रीन प्रभावी ठरत नाही, अशा वेळी "प्रोजेक्टर / LED TV" प्रभावीपणे काम करते.
*कमी किंमतीत ई - लर्निंग
# संगणक नसल्यास खर्च
@ CPU सहीत मिळणारा प्रोजेक्टर
Egate i12 projector या प्रोजेक्टरच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.
# इतर विविध साधनांच्या सहाय्याने शाळा कशी ई - लर्निंग करावी, यासाठी इथे क्लिक करा.