3री गणित विषयाचा सुट्टीतील गृहकार्य
टिप- हे गृहकार्य सर्वसामान्य मुलांना समोर ठेऊन तयार केला आहे. यात आपण मुलांच्या आवडीप्रमाणे व स्थानिक परिस्थितीप्रमाणे बदल करता येतील.
1. चढता व उतरता क्रम यांच्या 5 आकृत्या बनविणे.
उदा - खपटाच्या तीन - चार पायऱ्या बनविणे. व त्यावर चढत्या / उतरत्या क्रमाने संख्या दर्शवणे.
2. विविध वस्तूंचा संग्रह करणे. १ ते १०० अंक व तितक्याच वस्तू.
3. कोलाजकामाद्वारे अंकाचे आकार तयार करा. लहान मणी, निरुपयोगी धान्य कागदावर फेविकॉलद्वारे चिटकवून अंकाचे आकार तयार करा.
4. छापील चित्रातील अंक कार्ड तयार करणे.त्यांचा संग्रह बनविणे. व त्यापासून सांगितलेली संख्या बनविणे.
उदा- दिनदर्शिकेतील अंक
5. विविध वस्तूचे दशकाचे गठ्ठे तयार करणे.
उदा - चिंचोके गठ्ठे - 3 दशक गठ्ठे = 30
5. विविध वस्तूचे दशकाचे गठ्ठे तयार करणे.
उदा - चिंचोके गठ्ठे - 3 दशक गठ्ठे = 30
6. वस्तू / त्यांची चित्रे संग्रह -
उदा - गोलकृती वस्तू, चौरसाकृती वस्तू, आयताकृती वस्तू, शंकूकृती वस्तू, त्रिकोणाकृती वस्तू, इ.
उदा - गोलकृती वस्तू, चौरसाकृती वस्तू, आयताकृती वस्तू, शंकूकृती वस्तू, त्रिकोणाकृती वस्तू, इ.
7. लहान मुलांचे पैसे / नकली नोटांचा संग्रह करणे व मागितली रक्कम देणे.
8. दिलेल्या अपूर्णांकाचा आकार तयार करणे.
उदा - 1/2, 3/4, 1/4, 1/5, 1/3, 2/3, इ.
यासाठी खपटाचे विविध आकार तयार करुन सांगितलेल्या अपूर्णांकाइतक्या भागास रंग देणे.
9. दैनंदिन व्यवहारातील बेरीज व वजाबाकीची 10-10 व्यवहार लिहून काढणे. (स्वरुप शाब्दिक उदाहरणांप्रमाणे)