7 वी गणित विषयाचा सुट्टीतील गृहकार्य
टिप- हे गृहकार्य सर्वसामान्य मुलांना समोर ठेऊन तयार केला आहे. यात आपण मुलांच्या आवडीप्रमाणे व स्थानिक परिस्थितीप्रमाणे बदल करता येतील.
1. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मुळ संख्यांची संख्या इतके वस्तू असणारे पाँकीटे बनविणे. व त्यांचे समान संख्येचे ढीग करण्यास सांगणे.
उदा - 53.
53 ज्वारीच्या दाण्याची विभागणी समान संख्येच्या ढिगाऱ्यात करण्याचा प्रयत्न करणे.
2. कोणतेही पाच गणिती कोडी देणे, ते सोडवून आणने व त्यासारखीच आणखी किमान 5 कोडी तयार करणे.
3. कोलाजकामाद्वारे अंकाचे आकार तयार करा. लहान मणी, निरुपयोगी धान्य कागदावर फेविकॉलद्वारे चिटकवून अंकाचे आकार तयार करा. ( उदा- 1 ते 100 पर्यंतच्या वर्ग संख्या/मूळ संख्या/इ.)
4. छापील चित्रातील अंक कार्ड (0 ते 9 ) तयार करणे.त्यांचा संग्रह बनविणे.(कमीत कमी 4-5 संच) व त्यापासून सांगितलेली संख्या बनविणे. व बनविलेली संख्या ओळखणे. त्यातील कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत सांगता येणे.
उदा- दिनदर्शिकेतील अंक
5. विविध वस्तूंना एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लाख असे संकेतांक देणे. व त्यांचा संग्रह करुन सांगेल ती संख्याइतक्या वस्तू देणे. किंवा वस्तूवरुन संख्या सांगणे.
उदा - 4 कांड्या (हजार), 6 पेन्सिल (शतक), 5 चिंचोके (दशक), 8 खडे (एकक) = 4,658
6. कोणत्याही पाच वस्तूंची लांबी, रुंदी व जाडी मोजून त्यांची क्षेत्रफळे / परिमीती काढणे.
7. लहान मुलांचे पैसे / नकली नोटांचा संग्रह करणे व मागितली रक्कम देणे.
8. दिलेल्या अपूर्णांकास मुर्त रुपात सादर करणे.
उदा - 23/7
7 समान भाग केलेले 4 खपट घेऊन त्यातील 3 खपटाचे सातही भाग रंगवणे व चौथ्या खपटाचे 7 पैकी 2 भाग रंगवणे, असे.
[ यात खपटाचे विविध आकार तयार करुन सांगितलेल्या अपूर्णांकाइतक्या भागास रंग देणे.]
9. दैनंदिन व्यवहारातील बेरीज व वजाबाकी, गुणाकार व भागाकार यांची प्रत्येकी 10-10 व्यवहार लिहून काढणे. (स्वरुप शाब्दिक उदाहरणांप्रमाणे)