माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • धावणे / दौड

    धावणे / दौड

    प्रकार - दौड स्पर्धेचे अनेक प्रकार आहेत. जागेच्या व वेळेच्या मर्यादेने सर्व प्रकार शाळेत घेणे शक्य नसते. परंतु 100 मी.दौड हा प्रकार आपण शाळेत यशस्वीपणे घेऊ शकतो.

    क्रिडांगण - शाळेचे मैदान 100 मी. लांब नसते. अशा वेळी 50मी. लांबीच्या ट्रँकवर डबल फेरी किंवा चौकोनी मैदान असेल तर चौकोनी रनींग ट्रँक बनवू शकतो. ट्रँकची रुंदी सहभागी विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार ठेऊ शकतो.

    कृती - सुरुवात रेषेवर सर्व सहभागी विद्यार्थी रनींग पोझीशनमध्ये बसवावे. शेवट रेषेवरील गुण लेखकास इशारा करुन दौड सुरु करावी. शेवट रेषेला सर्वप्रथम  स्पर्श करेल, तो विजेता असेल. सर्वप्रथम 2-3 क्रंमांकही काढू शकतो.
    संकलन - सोमवंशी तानाजी 9011104464