माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • बेडूक उड्या

     क्रिडा प्रकार - वैयक्तिक मैदानी साहित्याशिवाय खेळ

    संकल्पना - बेडूक प्राणी ज्याप्रमाणे उड्या मारतो, त्याप्रमाणे उड्या मारत पुढे - पुढे जायचे. हा खेळ 5 ते 10 वर्षापर्यंच्या मुलांना खुप आवडतो.
    क्रिडांगण - मैदानावरील लहान - मोठे खडे व काटे वेचून घेऊन दूर फेकून द्या. क्रिडांगण लांबी ही 20 ते 50 मी. ठेवा. रुंदी विद्यार्थी संख्येनुसार ठेवा. [प्रति विद्यार्थी किमान 1मी.]

    कृती - सुरुवात रेषेवर दोन्ही हाताचे तळवे जमीनीवर टेकवून गुडघ्यात पाये दुमडून सावधान स्थितीत बसणे. अंतिम रेषेवरील गुणलेखकास इशारा देऊन शर्यत सुरु करावी.
    हात व पायावर बेडूक उड्या घेत मुले पुढे धावतात. जर कोणी उठून धावण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यास बाद करणे. जो शेवट रेषेवर अगोदर पोहोचतात, ते विजेते ठरतात. यात 2-3 उपविजेतेही काढता येतात. यात हाताच्या तळव्यावर भार पडत असल्याने योग्य व निटनेटकेच मैदान निवडावे.